Jalgaon Weather : शेतकऱ्यांनो, पिकांची काळजी घ्या! आगामी दोन दिवस पावसाचा ‘येलो अलर्ट’

---Advertisement---

 

Jalgaon Weather : जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाने ब्रेक घेतला आहे. अशात हवामान विभागाने पुन्हा जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी केला असून, शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली होती. परिणामी जामनेर, पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. यात शेती पिकांचे, पशुधन, जीवितहानी देखील झाली होती. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, आज शुक्रवारपासून हवामान विभागाने खान्देशातील जळगाव, धुळे नंदुरबार जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र उद्या २७ सप्टेंबरपासून दोन दिवस जळगाव जिल्ह्यात पावसाचा अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.

विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

गेल्या आठवड्यात पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली होती. परिणामी जामनेर, पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. मागच्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. अशात हवामान विभागाने पुन्हा जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी केला असून, विजांच्या कडकडाटा आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---