तरुण भारत लाईव्ह । ५ एप्रिल २०२३। आसाम व ओडिशा किनारपट्टीजवळ वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाल्याने बहुतांश भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. राज्यात ६ ते ८ एप्रिल पर्यंत सरी बरसण्याची शक्यता आहे.
मंगळवारी महाराष्टातील बहुतांश भागात हलका पाऊस झाला.ही परिस्थिती ८ एप्रिल पर्यंत कायम राहील. विदर्भ आणि छत्तीसगढ मध्ये हलका पाऊस पडेल तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील ५ दिवसात पावसाची शक्यता आहे. कोकणात ६ एप्रिल तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात ८ एप्रिल पर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व भागात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.