तरुण भारत लाईव्ह ।२१ फेब्रुवारी २०२३। जावा येझडी मोटरसायकलने नुकतीच येझडी रोडस्टर ही लोकप्रिय बाईक एका नवीन रंगाच्या ऑप्शनसह बाजारात लाँच केली आहे. या बाईकचे फीचर्स आणि आणि किंमत काय असेल हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
या बाईकचे फीचर्स असे आहेत कि या बाईक मध्ये असिस्ट आणि स्लिपर क्लच देण्यात आलात. ही बाईक डिस्क ब्रेक आणि ड्युअल-चॅनल ABS सह येते. सस्पेंशन ड्युटीसाठी, याला टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस ड्युअल शॉकऑब्जर दिलेत. 334cc सिंगल सिलेंडर इंजिनच्या पॉवरसह येते. यात 29bhp आणि 28.95 Nm चा पीक टॉर्क जनरेट दिलाय. पॉवर ट्रान्समिशनसाठी या बाइकमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आलाय.
येझडी बाईकच्या क्रिमसन रेड ड्युअल टोन कलर व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 2.03 लाख रुपये आहे. ही बाईक पांढरा आणि लाल रंगामध्ये उपलब्ध आहे.