तुम्ही पण सतत ‘इअरबर्ड्स’ वापरतात; मग ही बातमी वाचाच

तरुण भारत लाईव्ह । २२ मे २०२३। सध्याच्या काळात फोनवर बोलताना इअरबर्ड्स सगळ्याच्या कानांत सहज पाहायला मिळतात. हल्ली 10 पैकी 8 जणांच्या कानात इअरबर्ड्स सहज पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहित आहे का? की इअरबर्ड्सवरील घाणीमुळे आपल्या कानांत अनेक जिवाणू जाऊ शकतात आणि त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकते. तुम्ही देखील रोज हेडफोन्स किंवा इअरबर्ड्स वापरत असाल तर त्याची काळजी कशी कराल हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

इअरबर्ड्स सततच्या वापराने कानात मेणासारखी घाण आणि धूळ जमा होते. अशात त्याची योग्य निगा न राखल्यास कानाच्या आत इन्फेक्शनचा धोका निर्माण होऊ शकतो. जर आपण दररोज इअरबर्ड्स वापरत असाल तर कमीत कमी आठवड्यातून एक वेळा इअरबर्ड्सना स्वच्छ करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला उन्हाळ्यात जास्त घाम येत असेल तर चार दिवसांनी स्वच्छ करणे फायद्याचे ठरेल.

जेव्हा तुम्ही इअरबर्ड्सना आपल्या बॅगपॅक, पर्स, किंवा खिशात ठेवता तेव्हा त्यांच्यावर धुळ, लिंट आणि जिवाणू जमा होतात. त्यामुळे त्यांना नेहमी कव्हर मध्ये ठेवावे. याशिवाय इअरबर्ड्स भिजल्यावर त्यांना हवेत सुकवा. आपल्या इअरबर्ड्सना घामाच्या कपड्यांपासून दूर ठेवावे. जेव्हा तुम्ही त्यांचा वापर करत नसाल तेव्हा त्यांना त्यांच्या केसमध्ये किंवा प्लास्टिक बॅगेत व्यवस्थित ठेवावे.