Ul-Rahman on Shahbaz Sharif: भारतीय लष्कराने पाकिस्तानवर जबरदस्त क्षेपणास्त्र तसेच हवाई हल्ले करीत त्या देशातील नागरिकांची पळता भुई थोडी केली आहे. एकीकडे भारतीय सेनादल पाकिस्तानी सैन्याची दाणादाण उडवत असताना दुसरीकडे खुद्द पाकिस्तानच्या खासदारांनी स्वतःच्याच देशाचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
भारताने केलेल्या जोरदार हल्ल्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून केवळ २० किलोमीटर अंतरावर मोठा स्फोट झाला. त्यानंतर तातडीने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना बंकरमध्ये हलवण्यात आले. लोकांना धीर आणि दिलासा देण्याऐवजी आपले पंतप्रधान बंकरमध्ये लपून बसल्याचे कळताच पाकिस्तानचे खासदार संतप्त झाले. त्यांनी पाकी संसदेतून पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घ्यायलाही शरीफ यांची हिंमत होत नाही एवढे ते मोदींना घाबरतात, असा जबरदस्त हल्ला पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे खासदार शाहबाज अहमद यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांवर चढवला. एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू असताना पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या भूमिकेवर त्यांच्याच देशातील नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
खासदार उल-रहमान यांचाही हल्लाबोल
पाकिस्तानमधील जमियत उलमा इस्लाम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार फजल उल-रहमान यांनी देखील संसदेत भाषण करताना पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारविरुद्ध आपला संताप व्यक्त केला आहे. देश युद्धाच्या उंबरठ्यावर असून संसदेत कोणीही जबाबदार व्यक्ती आज संसदेत नाही, म्हणून मी देखील संसदेतून बाहेर पडत आहे, असे फलज उल रहमान यांनी म्हटले.
शाहबाज शरीफ यांच्या बोलण्यात दम नव्हता
भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशाला संबोधित केले. भारताला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल, असे शाहबाज शरीफ यांनी म्हटले होते. भारताच्या हल्ल्यात २६ नागरिक शहीद झाले, ज्यामध्ये लहान मुलांचाही सहभाग होता, असे शरीफ यांनी सांगितले. आम्ही पाकिस्तानी रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ, असेह शरीफ यांनी म्हटले. मात्र, शरीफ यांच्या देहबोलीवरून पाकिस्तानी नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. कारण, पंतप्रधान शरीफ यांच्या आवाजात मुळीच दम नव्हता, आणि आत्मविश्वासही ढासळलेला दिसत होता