‘तुम्हे आईने की जरुरत नही’! अमृता फडणवीसांचे नवे गाणे ऐकले?

प्रसिद्ध मराठी सेलिब्रेटी अन् गायिका अमृता फडणवीस या नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या व्हिडिओ आणि प्रतिक्रियांमुळे चर्चेत असतात. आता त्यांचं नवं गाणं श्रोत्यांच्या भेटीला आलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर त्या गाण्याची लिंक शेयर करुन चाहत्यांना नवं गाणं ऐकण्याचं आवाहन केलं आहे.

यापूर्वी देखील अमृताजींच्या वेगवेगळ्या गाण्यांना प्रेक्षकांचा, चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. नवरात्री, गणेशोत्सवच्या निमित्तानं त्यांनी गायलेल्या गाण्यांना श्रोत्यांनी उस्फुर्त दाद दिली होती. आता त्यांचे तुम्हे आईने की जरुरत नही या गाण्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चाही होत आहे.

केवळ मनोरंजनच नाहीतर राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक या सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मंचावर अमृताजी नेहमीच सक्रिय राहिल्या आहेत. त्यांनी या क्षेत्रातील कित्येक मान्यवरांशी संवादही साधला आहे. पर्यावरण आणि पर्यावरणाची सुरक्षा याच्या अनेक संस्थांशी अन् सामाजिक उपक्रमांशी त्या जोडल्या गेल्या आहेत.