Jalgaon Murder : भल्या पहाटे जळगावात थरार ; सोलर पॅनल बनवणाऱ्या तरुणाची भररस्त्यात हत्या

---Advertisement---

 

जळगाव : जळगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका २६ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बेंडाळे चौकाजवळ सोमवारच्या पहाटे ही घटना घडली. विशाल ऊर्फ विक्की रमेश मोची असे मृत तरुणाचं नाव असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलीस सुत्रानुसार, विशाल मोची हा रामेश्वर कॉलनीत आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. सोलर पॅनेल बसवण्याचे काम करून तो उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, पुष्पालता बेंडाळे चौकाजवळील एमएसईबी कार्यालयाजवळ पहाटे ३ च्या सुमारास त्याचा काही तरुणांशी वाद झाला. या वादातून अज्ञात ६ ते ७ हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने ६ वार केले.

या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने विशाल याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मयत विशाल मोची याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.

हत्येचं कारण अस्पष्ट

मात्र, या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---