Bhusawal Accident : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, भुसावळातील घटना

---Advertisement---

 

Bhusawal Accident : ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात भुसावळ शहरातील टेक्निकल हायस्कूलसमोर घडला. या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. मात्र, या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जळगावकडे जाणाऱ्या ट्रकने (क्रमांक एम.पी. ६८ झेड डी ३५१४) दुचाकीला (क्रमांक एम. एच. १९ बीडब्ल्यू ३३३२) धडक दिली.

त्यात दुचाकीस्वार दीपक पंडित करोले (वय ३५, रा. राहुलनगर, पांडुरंग टॉकीजजवळ, भुसावळ) हा गंभीर जखमी झाला. त्याला नागरिकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दीपक करोले याच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---