Dhule News : ‘त्या’ प्रकरणातील प्रमुख संशयित तरुणीने तुरुंगातच उचललं टोकाचं पाऊल

#image_title

धुळे : जिल्हा कारागृहात सेक्सटॉर्शन प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित तरुणीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (२१ जानेवारी) सकाळी उघडकीस आली. संबंधित तरुणीने आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. आज, बुधवारी तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

घटनेचा तपशील

न्यायालयीन कोठडीत असलेली ही तरुणी १८ जानेवारीपासून धुळे जिल्हा कारागृहात बंदीवान होती. २१ जानेवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास जेवणासाठी बॅरेकसमोर हजर न राहिल्यामुळे तिचा शोध घेण्यात आला. शोधादरम्यान महिला कर्मचारी कार्यालयाच्या मागील बाजूस संबंधित तरुणी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली.

घटनेची माहिती मिळताच तुरुंग अधीक्षक एकनाथ शिंदे आणि अन्य तुरुंगाधिकारी घटनास्थळी पोहोचले. वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.एस. पाटील यांनी तपासणी करून तरुणीला मृत घोषित केले.

हेही वाचा : पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ‘ती’ जायची परपुरुषासोबत; मुलीला जाग आली अन् महिलेचं कांड उघड

सेक्सटॉर्शन प्रकरणातील सहभाग

मृत तरुणी नंदुरबारमधील एका शिक्षकाला मैत्रीच्या जाळ्यात ओढून १२ लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या गटातील प्रमुख संशयित होती. या प्रकरणात ती १८ जानेवारीपासून न्यायालयीन कोठडीत होती.

हेही वाचा : Sharon Raj murder case : विश्वास ठेवावा तर कुणावर ? प्रेयसीनेच केला घात, अखेर फाशीची शिक्षा

तपास सुरू

घटनेच्या अनुषंगाने अधिक तपास सुरू असून तरुणीने आत्महत्या करण्यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारागृह प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

तुरुंग अधीक्षक काय म्हणाले?

तुरुंग अधीक्षक एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “तरुणीच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती समोर येईल. प्रशासन सर्वप्रकारे तपास करत आहे.”

दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर कारागृह व्यवस्थापनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून ही घटना प्रचंड खळबळ माजवणारी ठरली आहे.