---Advertisement---

Crime News : कूसुंब्यात तरुणीवर अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल

---Advertisement---

धुळे : कुसुंबा येथील कोकिळाई नगरात तरूणीवर एकाने बलात्कार केला. याप्रकरणी मावशीसह तिघांनी फसवणूक केल्याने तालुका पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कुसुंबा येथे राहणाऱ्या पीडित १९ वर्षीय तरुणीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.१ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास लाला जयस्वाल (वय २३ रा. नेर ता. धुळे) याने पीडित तरुणी राहत असलेल्या रूमवर येवून तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केला. तसेच तिला याबाबत कोणास काही सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

तसेच पीडितेची मावशी सपना राजकुमार वाडिले (वय ३८) व प्रविण राजू माळवे (वय २५ रा. निंबार कॉलनी, गल्ली नं. २, सेंधवा, जि. बडवाणी, म.प्र) यांनी पीडितेची फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय गुट्टे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment