---Advertisement---

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

---Advertisement---

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, विश्वजीत विठ्ठलसिंग सिसोदे (वय २७) असे संशयित तरुणाचे नाव आहे.

जामनेर तालुक्यातील एका गावातील पीडित तरुणी ही शिक्षणासाठी एरंडोल येथे वास्तव्याला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडित तरुणीची ओळख बुलढाणा जिल्ह्यातील बरेजवळा येथील विश्वजीत विठ्ठलसिंग सिसोदे (वय २७) याच्यासोबत झाली.

दरम्यान, ऑगस्ट २०२४ मध्ये ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. या मैत्रीचा गैरफायदा विश्वजीत याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिला जळगाव येथील एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. या हॉटेलवर तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. इतकेच नव्हे तर त्याने व्हिडीओ व फोटो देखील काढले. हे व्हिडीओ , व्हॅट्सॲप चॅट पीडितेला तिच्या आई- वडिलांना दाखविण्याची भीती दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला.

याप्रकरणी पीडित तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील विश्वजीत विठ्ठलसिंग सिसोदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment