---Advertisement---

Beed News : बॅटने मारहाण झालेला युवक सिंदखेडराजाचा

---Advertisement---

भुमराळा : बीड येथील मारहाणप्रकरण राज्यात गाजत आहे. आता सुरेश धस यांचा निकटवर्तीय सतीश भोसले याने दीड वर्षापूर्वी एकाला बॅटने जबर मारहाण झाल्याचा व्हिडीओ प्रसारित केला. त्या घटनेतील मारहाण झालेला कैलास वाघ हा तालुक्यातील सिंदखेडराजा माहेरखेड गावातील रहिवासी आहे.

कैलास वाघ हा बीड जिल्ह्यातील गावात पोकलेनवर ऑपरेटर म्हणून काम करीत होता. त्या कामाचे पैसे दिले नाही म्हणून कैलास वाघ घरी माहेरखेडला निघून आला होता. तेव्हा बीड जिल्ह्यातील ७ ते ८ जण कैलासच्या घरी येऊन बीड जिल्ह्यात घेऊन गेले व तिथे बॅटने आणि इतर साहित्याने बेदम मारहाण केली. त्याच्यावर १० दिवस अत्याचार केला. त्यानंतर कैलास वाघ पळून आला व जीव वाचविला.

तेव्हाच सिंदखेडराजा पोलिसांत कैलास वाघने तक्रार दिली होती. आता आमदार सुरेश धस यांना भेटायचे आहे व त्यांना हा सर्व प्रकार सांगायचा असल्याचे कैलास म्हणतो.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment