जुना वाद : जळगावात तरुणाला रॉडने मारहाण

जळगाव : शहरातील मेहरूण परीसरातील पोल्ट्री फार्मजवळ एका तरूणाला जुन्या वादातून लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी रविवारी 26 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एमआयडीसी पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

जुन्या वादातून केली मारहाण
राजकुमार प्रमोद मोरे (17, हनुमान नगर, मेहरूण, जळगाव) हा अल्पवयीन तरुण शनिवार, 25 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास जून्या वादातून राजकुमार मोरे याला त्याच भागात राहणारे लोकेश मुकेश सोनवणे, हर्षल राकेश सोनवणे, प्रफुल रमेश नेरकर आणि मानस भरत भोई (सर्व रा. मेहरूण, जळगाव) यांनी मेहरूण येथील पोल्ट्री फार्मजवळ लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर राजकुमार मोरे याने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्याने संशयित आरोपी लोकेश मुकेश सोनवणे, हर्षल राकेश सोनवणे, प्रफुल रमेश नेरकर आणि मानस भरत भोई (सर्व रा.मेहरूण, जळगाव) यांच्या विरोधात रविवारी मध्यरात्री एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.