कामानिमित्त दुचाकीने जात होता, अचानक नको ते घडलं… जळगावातील घटनेनं हळहळ

जळगाव : अंगावर गुलमोहरचे झाड पडल्याने १९ वर्षीय तरुणाने जीव गमावलाय. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय. कंपनीच्या कामानिमित्त दुचाकीने जात असताना अंगावर गुलमोहरचे झाड पडल्याने या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला. २५ रोजी रात्री अडीच वाजता ही घटना घडली. तुषार शांताराम महाले (१९) रा. राजीव गांधी नगर, पारोळा असे मयत तरूणाचे नाव आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, तुषार महाले हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तो जळगाव एमआयडीसीतील अमित इंडस्ट्रिजमध्ये कामाला आहे.  कंपनीच्या कामानिमित्त कंपनीत दुचाकी (एमएच १९ सीए २०३४) येत असतांना कंपनीच्या आवारात असलेल्या गुलमोहरचे झाड अचानक त्यांच्या अंगावर कोसळले. त्यात तुषार हा गंभीर जखमी झाला होता.

त्याला तातडीने जळगाव शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याची प्रकृती अधिक गंभी झाल्याने त्याला धुळे येथील छत्रपती हॉस्पिटल येथे दाखल केले. दरम्यान, त्यांच्यावर उपचारा सुरू असतांना शुकवारी २५ ऑगस्ट रोजी रात्री अडीच वाजता प्राणज्योत मालविली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काझी करीत आहे.