---Advertisement---
जळगाव : सेंट्रिंगचे काम आणि पाणीपुरी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या २८ वर्षीय तरुणाला नियतीने हिरावून घेतले. अमोल सुरेश हुजदार (वय २८, रा. हुडको, शिवाजी नगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे हुजदार कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जळगाव तालुक्यातील उमाळे गावाजवळ १ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बसने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात योगेश रामहरी नंदे (वय ३०, रा. गेंदालाल मील, जळगाव) हा तरुण जागीच ठार झाला. तर अमोल सुरेश हुजदार (वय २८, रा. हुडको, शिवाजी नगर) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
मृत योगेश नंदे हा सेंट्रिंगचे काम करून कुटुंबाला हातभार लावत असे. विशेष म्हणजे, सायंकाळी तो आपला लहान भाऊ नागेश याला शिव तीर्थ मैदान परिसरात पाणीपुरी विक्रीच्या गाडीवर मदत करायचा, योगेशच्या निधनाने त्याच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याची आई ताराबाई एका केटरर्सकडे कामाला जाते, तर वडील मिळेल ते काम करतात.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश नंदे आणि अमोल हुजदार हे दोघे जामनेर येथून जळगावला दुचाकीने परत येत होते. उमाळे गावाजवळ मागून भरधाव वेगाने आलेल्या बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, यात योगेश नंदे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या अमोल हुजदार याला जीएमसीत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.








