---Advertisement---

दुर्दैवी! जलतरण तलावात पोहण्याचं ठरलं अन् गाठलं नंदुरबार, पण नको ते घडलं

---Advertisement---

नंदुरबार : नंदुरबार : शहरातील बाळासाहेब ठाकरे जलतरण (Balasaheb Thackeray swimming) तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (३ एप्रिल) समोर आली. ललित सुधीर पाटील (वय १८, रा. रा. बाह्मणे, ता. शिंदखेडा, जि. धुळे) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ललित सुधीर पाटील (वय १८), नीलेश सुनील पाटील (वय १७), हर्षल संजय पाटील (वय १७) दुर्गेश प्रवीण पाटील (वय १७, सर्व रा. बाह्मणे, ता. शिंदखेडा, जि. धुळे), तसेच हितेश अधिकार पाटील (वय १७) हे दोंडाईचा येथून रेल्वेने नंदुरबार येथे आले होते. सर्व मित्र हे शहरातील बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावात पोहण्यासाठी गुरुवारी (३ एप्रिल) दुपारी बाराच्या सुमारास आले. दुपारी दोनच्या सुमारास पोहत असताना ललित पाटील हा आठ फूट खोली असलेल्या पाण्यात पोहण्यास गेला.

काही वेळानंतर तेथील त्याच्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर सुरक्षारक्षक हरीश दगडू निकम (वय २१) यांनी धाव घेत, ललित पाटील याला तलावातून बाहेर काढले. तो बेशुद्धावस्थेत होता. त्याला निकम यांनी लगेच रिक्षातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगला तुंगार यांनी तपासणीअंती ललित पाटील याला मृत घोषित केले. याप्रकरणी सुरक्षारक्षक निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सर्व मित्र हे बाळा साहेब ठाकरे जलतरण तलाव तेथे पाहण्यासाठी दिनांक. 03/04/2025 रोजी दुपारी 12/00 वाजता खबर देणारे हरिष दगडू निकम वय 21 वर्षे त्यांचे मित्र नामे – 1) ललित सुधीर मित्र असे बाळा साहेब ठाकरे जलतरण तलाव (सिमिंग पुल) येथे पोहण्यासाठी दुपारी 02/00 आलो होतो. ललित सुधीर पाटील हा 8 फुट असलेल्या पाण्यात कधी पाहण्यास गेला हे माहित नाही व काही वेळा नंतर 8 फुट पाहण्यात पोहणारे मुलांनी आरडा ओरडा केली तेव्हा तेथील घटने बाबत फोन द्वारे कळविले व त्यानंतर ललित पाटील यांचे काका आले.

त्यांनी सर्व मित्रास रिक्षामध्ये टाकुन जिल्हा रुग्णालय नंदुरबार तेथे नेले असता तेव्हा तेथील ड्युटीवरील डॉ, मंगला तुंगार यांनी दि. 03/04/2025 रोजी दुपारी 03/45 वाजता ललित सुधीर पाटील वय-18 वर्षे यास तपासुन मयत घोषीत केले. म्हणुन त्याचे मरणा बाबत नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला प्राथमिक खबर देऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment