---Advertisement---
नंदुरबार : शहादा शहरातील शिवराम नगरात भरधाव वेगातील मोटारसायकल घसरुन झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. चेतन मनोज ईशी (२६) असे अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
चेतन ईशी हा १४ ऑगस्ट रोजी सकाळी विजय सुकलाल शिंदे (३८) याच्यासोबत एमएच ३९ एपी ८६७२ या दुचाकीने भागापूर गावाकडे जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान शिवराम नगरातील काशिमा साडी सेंटरजवळील भरधाव वेगातील दुचाकी घसरल्याने चेतन ईशी यास गंभीर दुखापत झाली होती.
त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मृत घोषित असता, करण्यात आले याप्रकरणी राहुल सुकलाल शिंदे यांनी शहादा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन विजय शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक विश्वनाथ सपकाळके करत आहेत.