Viral News : पैसे देण्यास नकार दिल्याने तृतीयपंथीयांकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर तृतीयपंथीयांनी रेल्वेतून फेकून देत तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला असून, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पोलिसांना १४ मार्च रोजी रेल्वे ट्रॅकजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु होता. दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मारहाणीतील तरुण असल्याचे स्पष्ट झाले आहे. आदर्श विश्वकर्मा असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श हा गोंडवाना एक्स्प्रेसमधून गंजबसौदाला प्रवास करीत होता. दरम्यान, त्याच्याकडे तृतीयपंथीयांनी पैसे मागितले. या वेळी आदर्श याने पैसे देण्यास नकार दिल्याने तृतीयपंथी आणि त्याच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की, तृतीयपंथीयांनी निर्दयीपणे त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याला बाहेर फेकून दिल्याचे सूत्रानुसार समोर आले आहे.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसतंय की, आदर्श हा खाली पडला असून, तृतीयपंथी त्याच्या अंगावर उड्या मारताना दिसत आहे. शिवाय एक प्रवासी तो मेला आहे, आता तरी थांबा असं सांगत असल्याचं ऐकू येतंय. दरम्यान, व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर, पोलिस अधीक्षकांनी आदर्शच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
घटना कुठली?
आदर्श हा गंजबसौदा येथे वास्तव्याला होता. नोकरीच्या निमित्ताने तो रोज गंजबसौदा ते भोपाळ असा प्रवास करीत असे. दरम्यान, १५ मार्च रोजी रात्री आदर्श हा गोंडवाना एक्स्प्रेसमधून गंजबसौदाला प्रवास करीत होता.
या प्रवासादरम्यान, त्याच्याकडे तृतीयपंथीयांनी पैसे मागितले. या वेळी आदर्श याने पैसे देण्यास नकार दिल्याने तृतीयपंथी आणि त्याच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की, तृतीयपंथीयांनी निर्दयीपणे त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याला बाहेर फेकून दिल्याचे सूत्रानुसार समोर आले आहे.