तंबाखू न दिल्याचा राग; तरुणाला दगडाने ठेचून संपवलं, जळगाव जिल्ह्यातील घटना

---Advertisement---

 

जळगाव : तंबाखू न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाचा दगडाने ठेचून खून केला. ही धक्कादायक घटना अमळनेर उघडकीस आली असून, मुकेश भिका धनगर (वय ३८, रा. पैलाड, अमळनेर) असे मृताचे नाव आहे.

पोलीस सूत्रानुसार, तंबाखू न दिल्याच्या कारणावरून संशयिताने मुकेश भिका धनगर (वय ३८, रा. पैलाड, अमळनेर) याचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना दि. २१ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली.

मुकेश धनगर हा रविवारी रात्री ११ वाजता घराबाहेर गेला होता. हेडावे नाक्यावर त्याचे कोणाशी तरी भांडण झाल्याचे त्याचा भाऊ दिनेश धनगर यास समजले. त्याने घटनास्थळी जाऊन पाहिले असता दोघांमध्ये तंबाखू दिली नाही यावरून वाद सुरू होता.

दिनेश हा त्यांचे भांडण सोडवायला गेला असता निखिल याने त्यालाही दगड मारला. म्हणून तो घरी जाऊन त्याच्या इतर भावाला बोलवायला गेला. परत येऊन बघितले असता उतकर हा मुकेशच्या डोक्यात व तोंडावर दगडाने मारत होता. मुकेशला त्याच्या तावडीतून सोडवून त्याने दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दिनेश याच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी डीवायएसपी विनायक कोते, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनिरीक्षक नामदेव बोरकर, युवराज बागुल, हे कॉ. मिलिंद सोनार, विनोद संदानशीव व उदय बोरसे यांनी आरोपीस अटक केली. या प्रकरणी निखिल विष्णू उतकर (४५, रा. पंचवटी, नाशिक) याला अटक करण्यात आली आहे.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---