तीक्ष्ण हत्याराने तरुणाचा खून ; दहिगाव येथील घटना; दोघे आरोपी यावल पोलिसात हजर

---Advertisement---

 

यावल : तालुक्यातील दहिगाव ते विरावली रोडवर पुलाच्या पुढे डाव्या बाजूला शेतात जाणाऱ्या खिरव्या नाल्याच्या रस्त्यावर एका तरुणाची तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर तोंडावर, जबड्यावर, कंबरेच्या व उजव्या बाजूला वार करून दोघांनी निघृण हत्या केली. या घटनेनंतर दोघे जण स्वतःहून यावल पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही या तरुणाचा खून केला, असे सांगून पोलीस स्टेशनला हजर झाल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडल्याने यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी २९ रोजी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर गजानन पाटील, गजानन रवींद्र कोळी (दोन्ही रा. दहिगाव), इमरान युनुस पटेल यांच्यामध्ये अज्ञात कारणावरून भांडण झाले. त्यात इमरान युनुस पटेल यास ज्ञानेश्वर पाटील व गजानन कोळी यांनी खिरव्या नाल्याच्या बाजूला दहिगाव ते विरावली रस्त्यात तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर, तोंडावर, जबड्यावर व कमरेच्या वर उजव्या बाजूला वार करून त्याला जागीच ठार केले.

दोघे संशयित आरोपी स्वतः हून यावल पोलीस स्टेशनला येऊन हजर झाले. ही वार्ता संपूर्ण यावल तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली, तर इमरान पटेल हा मूळचा रहिवासी हनुमंत खेडा पोष्ट पिंपरी, ता. धरणगाव येथील रहिवासी असून त्याचे वडील ईसा पटेल हे वाहन चालवण्याचा (ड्रायव्हर) व्यवसाय करतात.

मयत इम्रान पटेल याची आजी फातिमाबी पटेल व आजोबा ईशा हिराजी पटेल हे सुरेश आबा नगर दहिगाव येथे चाळीस वर्षांपासून राहत असून हातमजुरी करतात. त्यांच्या वृद्धापकाळमुळे नातवाला देखरेखीसाठी त्याच्यासोबत ठेवलेले होते. तो दहिगाव येथे दोन वर्षापासून राहत होता. अधून मधून हनुमंतखेडे येथे घरी जात येत होता.


ही घटना घडली त्यावेळेला रात्री दहा वाजेच्या सुमारास मन्वर मासूम पटेल (रा. दहिगाव) यांनी फिर्यादी युनुस पटेल यांना फोनद्वारे त्याचे वडील यास सदर घटना कळवली. त्यावेळी सर्व हनुमंतखेडे येथील नातेवाईकांनी यावल ग्रामीण रुग्णालयात गाठत माहिती जाणून घेतली. युनूस ईसा पटेल यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला दोघा संशयित आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवार (३० ऑगस्ट) रोजी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहावर शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह दिला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---