ड्रग्जच्या जाळ्यातही पुण्याची तरूणाई; दोन तरूणींचा ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडीओ समोर

पुणे : पुण्यातील एका मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन होत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दोन तरूणी एका हॉटेलच्या वॉशरूममध्ये ड्रग्जचं सेवन करत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, पुण्यातील प्रसिद्ध एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आला होता. हे प्रकरण चर्चेत असतानाच आणखी हा व्हिडिओ समोर आल्याने गुन्हेगारीच्या वाढत्या घटनानंतर ड्रग्जच्या जाळ्यातही पुण्याची तरूणाई अडकल्याचं दिसत आहे.

#pune #drug #DrugsFreeBharat pic.twitter.com/kyf8ceS6uF

— Harish Malusare (@harish_malusare) June 24, 2024

पुणे-नगर रस्त्यावरील एका नामांकित मॉलमध्ये असलेल्या पबमधील हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडिओ दोन-तीन महिन्यापूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या व्हिडीओची तत्काळ दखल घेतली असून यासंबंधीने तपासही सुरू केला आहे.

दरम्यान, पुण्यातील नामांकित हॉटेलमधील अल्पवयीन मुलांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आला होता. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेत आठ जणांना ताब्यात घेतलं आहे.