दुर्दैवी ! आंघोळीसाठी विहिरीतून पाणी काढत होता तरुण; अचानक… घटनेनं गावावर शोककळा

जळगाव : शेतात खत देऊन झाल्यानंतर आंघोळीसाठी उतरलेल्या टाकळी (ता.जामनेर) येथील १८ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी तीन वाजेदरम्यान पिंपळगाव गोलाईत शिवारात ही घटना घडली.  धीरज नारायण पवार (१८) असे मयत तरुणाचे नाव आहे.

जामनेर तालुक्यातील टाकळी येथे धीरज नारायण पवार हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. बुधवारी धीरज हा श्रीधर झावरु यांच्या शेतात खत टाकायसाठी गेला. खत टाकून झाल्यानंतर आंघोळीसाठी विहिरीतून पाणी काढत असताना हातातील लोखंडी कडी षटकून पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने धीरज याचा बुडून मृत्यू दुर्दैवी झाला.

तलाठी मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. धीरज याचा मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

विहीर खोल
श्रीधर झावरू यांच्या शेतातील विहीर खोल असून त्यात जवळपास ३० फुटापेक्षा जास्त खोल पाणी आहे. धीरज हा पाण्यात बुडाल्याचे लक्षात येतात विहिरी शेजारी उभे असलेल्या सहकार्याने आरडाओरड केली. इतर लोक धावून येईपर्यंत धीरज पाण्याखाली गेला होता. तीन तासांच्या परिश्रमानंतर धीरज याचा मृतदेह करण्यात जामन्यारातील भोई बांधवांना यश आले.