ZP Jalgaon : अनुकंपाधारकांची प्रतीक्षा संपली, पुढील आठवड्यात नियुक्ती पत्र मिळण्याचे संकेत

---Advertisement---

 

जळगाव : जिल्हा परिषदेत आगामी आठवड्यात अनुकंपाधारक ८६ जण नोकरीवर रुजु होणार आहेत. याची प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. या अनुकंपाधारांच्या कागदपत्रांची छानणी पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारी १५ सष्टेबर रोजी त्यांना पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत नोकरीच्या ऑर्डर देण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या पुढाकाराने ही भरती केली जात आहे. शासकीय सेवेत सामावून घेतले जात असल्याने अनुकंपाधारकांची यावर्षी दिवाळी-दसरा आनंदनात साजरा होणार आहे .

जिल्हा परिषदेत १७१ अनुकंपाधारकांची प्रतिक्षा यादी आहे. तर गट डच्या ८६ जागांवर यादीतील कर्मचाऱ्यांना पदस्थापना देण्यात येईल. जिल्हा परिषदेत गट क च्या जागा रिक्त नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी गट ड वर पदस्थापनेस नकार दिला आहे. जि. पतील अनुकंपाधारकांची यादी यामुळे कमी होणार आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्यांना शासकीय नोकरीत स्थान मिळणार असल्याने त्यांच्यात उत्सहात दिसून येत आहे.

तिन वर्षात ३३७ कर्मचाऱ्यांची भरती

जि.पचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या काळात अनुकंपाधारकांची दोन वेळा भरती झाली होती. त्यात २६७ – कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यात आले होते. तर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांच्या काळात देखील ७० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. आता मिनल करनवाल यांच्या पुढाकाराने ८६ अनुकंपाधारकांना शासकीय नोकरीचे गिफ्ट मिळणार आहे. नवरात्र अथवा दसऱ्यापुर्वी हे कर्मचारी सेवेत दाखल होतील असे सांगण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---