---Advertisement---
---Advertisement---
सारण : मिलाद-उल-नबी निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत राष्ट्रध्वजाची विटंबना केल्याची घटना घडली आहे. अशोकचक्राच्या ठिकाणी चंद्र आणि ताऱ्यासह तिरंगा ध्वज फडकवत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन तरूणांना ताब्यात घेतले. सोमवारी कोपा पोलीस ठाण्यांतर्गत बाजार पेठ येथे हा प्रकार घडला आहे. तसेच असाच प्रकार राजस्थानातील कोटा येथे घडला होता.
पोलिसांनी घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले की, मिलाद-उल-नबी निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत कट्टरपंथींनी राष्ट्रध्वजावर चंद्र आणि ताऱ्यासह राष्ट्रध्व फडकवला. यामुळे राष्ट्रध्वजाची विटंबना झाली होती. सारण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाद्वारे एक व्हिडिओ व्हायरल होत असून राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचे दिसून आले. यामुळे भारताचा ध्वज संहिता २००२ सह अनेक कायद्यांचे कट्टरपंथींनी उल्लघन केले आहे.
कट्टरपंथींनी विटंबना केलेला राष्ट्रध्वज आता पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला आहे. यामध्ये सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.