जळगाव : अँड. एस.ए.बाहेती महाविद्यालय, जळगाव येथे ‘ग्रंथालय’ आणि ‘मराठी विभागा’च्या वतीने आज शनिवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला.
यावेळी ‘मराठी विभागा’च्या वतीने ‘चला वाचूया; स्वतःला घडवूया’ या विषयावर ग्रंथपाल प्रा. टी.एस.पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानात त्यांनी वाचण्यासाठी असलेले विविध विषय, जीवनात वाचनाचे महत्त्व आणि वाचनाने आपल्यावर घडत असलेले संस्कार याविषयी माहिती सांगितली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल लोहार यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारासह आपल्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असलेलं वाचन आणि वाचन संस्कृतीचं महत्त्व याविषयी विविध ग्रंथाचे दाखले देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले।
‘वाचन प्रेरणा दिना’च्या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी. यासाठी ग्रंथालय विभागाच्या वतीने सामाजिक, राजकीय,साहित्यिक , सांस्कृतिक यासह ग्रंथालयातील विविध विषयावरील पुस्तकं, मासिक आणि वर्तमान पत्रांचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाच्या प्रा. रेणुका झांबरे यांनी केले तर प्रा. मोरेश्वर सोनार यांनी आभार मानले.. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.