जळगाव : राज्यभरात अंगणवाडी सेविकांचे विविध मागण्यांसाठी संप सुरु आहेत. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जळगाव शहरातील स्वातंत्र्यवीर चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत आज मंगळवारी दुपारी १२ वाजता मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कासार आरडीसी यांना निवेदन देण्यात आले.
गेल्या पाच वर्षापासून केंद्र सरकारने या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केलेली नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या सिविल अपील नंबर 3153 / 2022 चे अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी त्यात म्हटल्याप्रमाणे की, अंगणवाडी सेविका याना मिळणारा मोबदला वेतनच आहे तरी त्यानुसार त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून वेतनश्रेणी भविष्य निर्वाह निधी ग्रचूटी ,सामाजिक सुरक्षा इत्यादी सर्व लाभ देण्यात यावेत. आशांच्या मानधनात जाहीर केलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका मदतनीस यांना ताबडतोब भरीव मानधन वाढ जाहीर करावी. मदतनीस सेविकांचे मानधन किमान अनुक्रमे 18000₹ ते 26000₹ पर्यंत असावे सेविका मदतनीसंच्या मानधनात 100 :75 असां फरक असावा.
मानधन वाढले तरी महागाई त्याच्या दुपटीने वाढल्यामुळे ते कमीच पडते तरी मानधन महागाई निरदेशांक जोडून दर सहा महिन्यांनी त्यात निर्देशांकानुसार वाढ करावी.
माननीय महिला बाल विकास मंत्री यांचेशी चर्चा झाल्याप्रमाणे विना योगदान मासिक निर्वाह भत्ता( पेन्शन) सेवा निवृत्ती नंतर देण्याचा प्रस्ताव माननीय मंत्र्यांनी मान्य केल्याप्रमाणे नोव्हेंबर२३ अखेरपर्यंत तयार करून तो हिवाळी अधिवेशनात मंजूर करून घ्यावा. महानगरपालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यांसाठी पाच हजार ते आठ हजार रुपये भाडे मंजूर करावे. बालकांचे आहाराच्या आठ रुपये दर अत्यल्प असून त्यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याऐवजी उलट त्यात वाढ होत आहे तरी हा सर्वसाधारण बालकांसाठी 16 व अति कुपोषित बालकांसाठी 24 रुपये असावा. अशी दिलेल्या निवेदन करण्यात आली आहे.
मोर्चात जळगाव, चोपडा, धरणगाव, यावल, एरंडोल, जामनेर भुसावळ आदी तालुक्यातील सेविका मदतीस यांनी सहभाग घेतला. लता ठाकरे, सुनंदा पाटील, संगीता चित्रा पाटील, कवीता वारे, कविता पाटील, सुनंदा कदम, एम एस सोनवणे, सुलेखा पाटील, शोभा बिराडे, कल्पना सपकाळे, मीना साळवे, शोभा निकम ,शितल पाटील, मीना पाटील, मंगला पाटील, संध्या पाटील ,सुरेखा पाटील, सुलेखा पाटील, कल्पना सईंदाणे ,कैकशा वृंदा पाटील, कविता सोनवणे, लता पाटील, वैशाली भरत चौधरी, नर्मदा कोळी, अनिता पिंपराळे, कमल बाई माळी, आदी सेविका मदत नीसांचा समावेश होता.
दरम्यान, 15 डिसेंबर रोजी नागपूर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे विधानसभेवर जोरदार मोर्चाच्या आयोजन करण्यात आले आहे. मोर्चासाठी 14 डिसेंबर रोजी सायंकाळीभुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव या सोयीच्या ठिकाणी सायंकाळी सेवाग्राम एक्सप्रेस ने जाण्यासाठी यावे, अशी आवाहन कामरेड महाजन, प्रेमलता पाटील यांनी केले आहे.