अकबर हा अत्याचारी राजा होता,मग तो ‘महान’ कसा ? राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी राज्याच्या शालेय अभ्यासक्रमावर केले अनेक प्रश्न उपस्थित.

राजस्थान: राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी राज्याच्या शालेय अभ्यासक्रमावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आपण कोणत्याही प्रकारे अभ्यासक्रमात बदल करण्याच्या बाजूने नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढच्या पिढीला चुकीची दिशा देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. पूर्वजांची दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे. महापुरुषांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच शिक्षणमंत्री मदन दिलावर म्हणाले की, अकबर महान आहे, मग तो महान का आहे ? अकबर हा अत्याचारी राजा होता. तो महान कसा होऊ शकतो?

त्याचा मुलांच्या मनावर काय परिणाम होईल?
मंत्री मदन दिलावर म्हणाले की, महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात युद्ध झाले होते. महाराणा प्रताप हे नेहमीच देशासाठी आणि मेवाडसाठी लढले, मग त्यांच्याशी लढणारे कोणी देशाच्या हिताचे कसे? काही वर्षांपूर्वी मी ऐकले होते की चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग हे दहशतवादी आहेत असे काही पुस्तकांमध्ये शिकवले जात होते. आपल्या देशभक्तांनी क्रांतिकारकांना दहशतवादी शिकवले तर मुलांच्या मनावर काय परिणाम होईल? त्यांची दिशा काय असेल? मंत्री पुढे म्हणाले की, वीर सावरकर अजिबात देशभक्त नाहीत, असं हि अभ्यासक्रमातून शिकवलं जात, मग हे आम्ही कसे मान्य करणार ? असे काही भाग असतील तर आम्ही त्यांचे पुनरावलोकन करत आहोत. ते भाग शालेय अभ्यासक्रमातून बदलण्याचा प्रयत्न करणार. असं ते म्हणाले .