---Advertisement---

खळबळजनक! अक्कलकुव्यात अल्पवयीन मुलानेच केला वर्गमित्राचा खून

by team
---Advertisement---
तरुण भारत लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२२ । अक्कलकुवा शहरातील जामिया संकुलातील माध्यमिक व उच्च माध्यमिक इंग्रजी शाळेत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या वर्गमित्रानेच चाकूने भोसकून हत्या केली. ही घटना ६ रोजी दुपारी १.३०  ते रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून संपूर्ण जामिया परिसर सुन्न झाला आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
तकी फैजल उर रहेमान अब्दुल खालिक (वय १५, रा अहमदाबाद) असं मयत मुलाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहेमान हा शहरातील जामिया संकुलातील माध्यमिक व उच्च माध्यमिक इंग्रजी शाळेत व जामिया वसतिगृहात वास्तव्यास होता. दरम्यान,  ६ रोजी नियमित शाळा सुटल्यानंतर दुपारी १.३० ते रात्री ९ वाजेच्या सुमारास खालिकचा आरोपी अल्पवयीन मुलाने मोबाईल फोनची चोरी केल्याचे कारणास्तव जुन्या शाळेच्या इमारतीतील मुलांच्या प्रसाधन गृहात बोलवून चाकूने मानेवर तसेच पोटावर वार करून खून केला.
जामिया शैक्षणिक संकुलाचे पब्लिक रिलेशन अधिकारी शेख जावेद बनू पटेल यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोलीस उपाधीक्षक संभाजी सावंत यांनी भेट देऊन माहिती घेतली. अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गु र न 571 भादवि कलम 302 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित करीत आहेत.

दरम्यान, या संकुलात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणारे हे दोन्ही एकाच वर्गात शिक्षण घेत होते विशेष म्हणजे दोन्ही गुजरात राज्यातील रहिवासी असून मयत हा अहमदाबाद येथील तर आरोपी हा सोनगड येथील असल्याची माहिती आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment