जळगाव : शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून, आता पोलिसही ऍक्शन मोडवर आले आहेत. पहूर परिसरासह जिल्ह्यात आपली दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगार मयूर शाम जोशी रा.पहूर कसबे यास पहूर पोलीसांनी सापळा रचून शिताफीने अटक केली .
जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता वेळोवेळी उल्लंघन करून दाखल असलेल्या खटल्याकामी न्यायालयात उपस्थिती देत नव्हता. जिल्हा न्यायाधीश वर्ग-१ व अतिरिक्त सत्र न्यायालय जळगाव यांचे कडील खटला क्र.१२२/२०१९ मधील अट्टल गुन्हेगार आरोपी मयुर शाम जोशी रा.पहूर कसबे ता.जामनेर याचे नावे NBW अजामीन पात्र पकड वारंट न्यालायाने काढले होते.
त्यानुसार आदेशाची अंमल बजावणी करण्यात येऊन पहूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी त्याच्यावर पाळत ठेवीत सापळा रचून शिताफीने अटक केली. आरोपी मयुर शाम जोशी या अट्टल गुन्हेगारावर मुक्ताईनगर पोलीस स्टेशन ,जिल्हापेठ पोलीस स्टेशन जळगाव ,रामानंद पोलीस स्टेशन जळगाव इ. पोलीस स्टेशनात गुन्हे दाखल आहेत.
या गुन्ह्यासह त्याच्यावर पहूर पोलीसांकडून कारवाई करण्यात येऊन जिल्हा सत्र न्यायालयासमोर दि.१२मार्च २०२४ रोजी हजर करण्यात आले.जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानूसार आरोपी मयूर जोशी याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.