जळगाव: एका अनोळखी गतीमंद तरुणाने शेत शिवारातील विहिरीत उडी मारली. ही खबर कळताच शनिपेठ पोलीस – अग्निशमन जवानांनी तब्बल तीन तासांचे रेस्क्यू ऑपरेशन राबवित या तरुणाला विहीरीतून सुखरुप बाहेर काढले. शहरातील ज्ञानेश्वर नगरातील श्रावण नगराजवळील शेतातील विहिरीत हा प्रकार गुरुवार ११ रोजी सायंकाळी समोर आला. विवेक जगताप यांच्या शेतातील विहिरीजवळ गेल्या चार ते पाच दिवसांपासून एक अनोळखी गतीमंद तरूण हा फिरत होता.
गुरुवारी सायंकाळी त्याने या विहिरीत उडी मारली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांसह अग्नीशमन विभागाला माहिती दिली. शनीपेठ पोलीस ठाण्याचे पीएसआय योगेश ढिकले, पीएसआय मुबारक तडवी, पो.कॉ. विजय खैरे, मुकेश गंगावणे, नवनित चौधरी हे तत्काळ घटनास्ळी रवाना झाले. अग्नीशमन विभागाचे चालक प्रकाश चव्हाण, गंगाधर कोळी, संजय तायडे, पिंटू पाटील, राजू चौधरी, तेजस जोशी, अश्वजीत घरडे यांचे पथकही येथे येऊन संयुक्तरित्या रेस्क्यू ऑपरेश राबविले.