अजबच ! चक्क चालकशिवाय धावली मालगाडी, 80 किलोमीटरहून अधिक प्रवास केला.

जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये रविवारी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे . डिझेल इंजिनवर चालणाऱ्या मालगाडीने चक्क चालकाशिवाय 80 किलोमीटरहून अधिक प्रवास केला. याबाबत रेल्वे मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कठुआ स्थानकावरून एक मालगाडी लोको पायलट विना पंजाबच्या दिशेने निघाली. ही मालगाडी ज्या ठिकाणी रुळावर उभी होती त्या ठिकाणी थोडा उतार आहे. गाडीला ब्रेक नसल्यामुळे ही मालगाडी कठुआ रेल्वे स्थानकावरून पंजाबच्या दिशेने धावली. सुमारे 100 च्या वेगाने 80 किलोमीटर पर्यंत धावली.मात्र, या काळात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही.प्राथमिक तपासात त्यावेळी त्याला रेल्वे स्थानकावर ड्युटी देणाऱ्या सर्वांची चौकशी करण्यात येत आहे.

रेल्वे मंत्रालय आणि उत्तर रेल्वेच्या वेगवेगळ्या पथकांनी कठुआ रेल्वे स्थानकाला भेट दिली आणि तेथे उपस्थित पुरावे आणि तथ्यांचे विश्लेषण केले. अंतर कापल्यानंतर उची बस्सी जवळ चढल्याने गाडी थांबली. वाळूच्या पोत्याच्या सहाय्याने ट्रेन यशस्वीपणे थांबवण्यात आली. जम्मूचे विभागीय वाहतूक व्यवस्थापक प्रतीक श्रीवास्तव यांनीही सांगितले की, ‘प्रथम पाहिल्यास असे दिसते की ट्रेन पंजाबच्या दिशेने जात असताना उतारावरून खाली घसरली होती.