सोयगाव : अजिंठा पोलीस ठाणे हद्दीत पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कारवाई करत वाहनासह २७ लाख ३२ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा मुद्देमाल पकडला. ही कारवाई शनिवारी अजिंठा घाटात करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन वाहनासह एकास ताब्यात घेतले आहे, अशी माहिती विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी दिली. हा प्रतिबंधित गुटखा गाडीमधून नेण्यात येत होता.
पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांचे विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, सहकारी नवनाथ कोल्हे, सोनवणे, धापसे हे गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पथकाने कारवाई करत अजिंठा घाटामध्ये अली इसाक सय्यद (३२ वर्ष, रा. पवननगर, वाळुंज, ता. गंगापूर, छत्रपती संभाजी नगर यास स्विफ्ट कार क्र.एम.एच.२० डि.व्ही. ११७४ या वाहनासह पाठलाग करून ताब्यात घेतले आहे, तर दुसरे वाहन किया एम.एच.२० एफपी – २८२४ताब्यात घेतली. गणेश काकडे रा. रांजणगाव शेणपुंजी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर हा फरार झाला आहे