Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला आहे त्यानुसार भाजप 30, राष्ट्रवादी काँग्रेस 7आणि शिवसेनेच्या वाट्याला 11 जागा आल्या आहेत. अजित पवार गटाने आपल्या 6 जागांवरील उमेदवार निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार गटाच्या उमेदवार निश्चित झालेल्या जागांमध्ये रायगड, बारामती, शिरुर, सातारा, धाराशीव
आणि परभणीचा समावेश आहे.
राष्ट्रवादीचे हे 6 उमेदवार निश्चित
बारामती : सुनेत्रा पवार
सातारा : रामराजे नाईक निंबाळकर
रायगड : सुनिल तटकरे
परभणी : राजेश विटेकर
शिरूर : शिवाजीराव आढळराव पाटील
धाराशीव : दाजी बिराजदार