अजित पवार गटाला मोठा धक्का! निलेश लंके पक्षातून बाहेर

अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. पारनेर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष्याना आपला राजीनामा आजच पाठवणार असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची त्यांनी स्पष्ट केलं.

आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर लंके म्हणाले की, मतदार संघातील सर्व मतदारांची मी माफी मागतो. त्यांनी मला पाच वर्षांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले होते. मात्र, लोकसभेला सामोरे जायचे असेल तर हा कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. चार महिने शिल्लक असतानाच हा कटू निर्णय मला घ्यावा लागत असल्याचे म्हणत नीलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.