पुणे : लोकसभा निवडणुकी बाबतचा महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जागावाटप संदर्भात अजित पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा दिल्लीला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा दिल्ली गाठणार आहेत.
महायुतीच्या जागावाटपात भाजपकडून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला केवळ विनींग सीट दिल्या जाणार असल्याची चर्चा आहे. भाजपला 34 ते 35, अजित पवार यांच्या गटाला 3 ते 4 तर शिंदे गटाला 12 ते 13 जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात आले तेव्हापासून जागा वाटपाच्या हालचालींना वेग आलाय.
“कॅबिनेट झाल्यावर मी, एकनाथ शिंदे, फडणवीस, बावनकुळे दिल्लीत जाऊ. तिथे जागा वाटपाबाबत चर्चा होईल. त्यानंतर काय ते फायनल होईल. तिघांचा सन्मान होईल अशी पद्धतीने जागा वाटप होईल”, असेही अजित पवार म्हणालेत.