---Advertisement---

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार, सुसाट धावणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी

by team

---Advertisement---

---Advertisement---

धरणगाव : धरणगाव-सोनवद रोडवरील स्मशानभूमीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. पंढरीनाथ श्यामराव मराठे (वय 75, रा. धानोरे ता. धरणगाव) असे मयत वृद्धाचे नाव आहे.  यासंदर्भात सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव-सोनवद रोडवर स्मशानभूमी जवळील छोट्या पुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एक वाहन मागे येत असताना सायकलस्वार पंढरीनाथ मराठे यांना धक्का बसला. अपघात होताच उपस्थित नागरिकांनी त्यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. यासंदर्भात रविवारी दुपारपर्यंत पोलिस स्थानकात कुठलीही नोंद नव्हती. सुसाट धावणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

 

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---