धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल दुचाकी चोरट्याच्या मुसक्या बांधल्या आहेत. संशयिताच्या ताब्यातून चोरीच्या चार दुचाकी T जप्त करण्यात आल्या असून त्यातील दोन दुचाकींबाबत देवपूर व पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल आहे. भास्कर छगन मोरे (३६, कदमबांडे नगर, नगाव बारी, देवपूर, धुळे) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून केली कारवाई
संशयित भास्कर मोरे याच्याकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने चार चोरीच्या दुचाकी काढून दिल्या. देवपूर व देवपूर पश्चिम पोलिसात दोन दुचाकींबाबत डे गुन्हे दाखल असून अन्य दुचाकींबाबत माहिती काढण्याचे काम यंत्रणेकडून सुरू च आहे. ८२ हजार रुपये किंमतीच्या एकूण ४ दुचाकी चोरट्यांकडून जप्त करण्यात आल्या आहेत.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, बाळासाहेब
सुर्यवंशी, अमरजीत मोरे, संजय पाटील, शाम निकम, संतोष हिरे, मुकेश वाघ, चेतन बोरसे, पंकज खैरमोडे, शशिकांत देवरे, जितेंद्र वाघ, महेंद्र सपकाळ, गुणवंत पाटील, हर्षल चौधरी, चालक कैलास महाजन आदींच्या पथकाने केली