चोपडा : अडावद येथे बुधवार, २१ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कामावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली होती. यावेळी दगड, विटा, लाकडी व लोखंडी दांड्यांचा वापर करण्यात आला होता. दरम्यान, सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.
अडावद येथे बुधवार, २१ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास रस्त्याच्या प्रार्थनास्थळाजवळ एका रस्त्याच्या कामावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी दगड, विटा, लाकडी व लोखंडी दांड्यांचा वापर करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी धाव घेतली, तसेच काही वेळात कमांडो पथक देखील दाखल झाल्यामुळे जमाव पांगला.
दरम्यान, या प्रकरणी कठोर कारवाईच्या मागणीसाठी एका समुदायातील स्त्री-पुरूष रात्री उशीरापर्यंत अडावद पोलीस स्थानकाच्या परिसरात जमले होते. मात्र पोलिसांनी त्यांना पांगवले. ताज्या वृत्तानुसार, सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.