---Advertisement---

अधिकृत मीटर घेऊन देखील वीज चोरी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

by team

---Advertisement---

परभणी : महावितरण कार्यक्षेत्रात अधिकृत मीटर घेऊन देखील वीज चोरी केली केल्याची घटना उघडकीस आली आहे . वीज मीटरमध्ये छेडछाड करून मीटर बंद केल्यानंतर वीज चोरी केली जात होती. माहितीच्या आधारावर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात महावितरणाकडून अधिकृत मीटर घेऊन देखील,छेडखानी करून मीटरमधून वीज चोरी होत होती. हा प्रकार गेल्या चार वर्षांपासून चालू होता . यात एकूण ५७ हजार १०२ युनिट वीज चोरी केल्याचा प्रकार समोर आला.अनधिकृतपणे वीज चोरी करून महावितरण कंपनीचे १७ लाखांचे नुकसान केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चौकशी सुरु करण्यात ली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---