अनिल परब यांचे साई रिसॉर्ट अनधिकृत; 4 आठवड्यात पाडण्याचे हायकोर्टाचे आदेश

मुंबई : उबाठा नेते अनिल परब यांना मुंबई हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०२० मध्ये या रिसॉर्टप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आज मुंबई हायकोर्टाने रिसॉर्ट चार आठवड्यात पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दापोलीमधील साई रिसॉर्ट पडणार हे आता निश्चित झालं आहे.

साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं हायकोर्टामधील सुनावणीदरम्यान स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अनिल परब आणि सदानंद कदम यांना चार आठवड्यात हा रिसॉर्ट पाडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने त्यांना दिले आहे.