जळगाव : राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग अध्यक्ष ना.अंतरसिंह आर्या हे जळगाव दौऱ्यावर आले असताना प्रा. संजय मोरे यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
भाजपा अनुजाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव तथा अँटी करप्शन मानव अधिकार सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. संजय मोरे,याच्या नेतृत्वाखाली संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील कोळी बांधवाना टोकरे कोळी जमात प्रमाणपत्र मिळण्या बाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनात पुढील प्रमाणे मागण्या असून संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 1976 पासुन 30 % लोकांना टोकरे कोळी जमात प्रमाणपत्र मिळलेले आहे. 70 % लोकांना टोकरे कोळी जमात प्रमाणपत्र मिळालेले नसून त्यांना कॆद्रीय शासकीय नोकरी विविध शासकीय योजनापासुन वंचित रहावे लागत आहे.
राज्यातील 1 कोटी 30 लाख आदिवासी लोकांसाठी महाराष्ट्र शासनाचा विकास विभाग आहे. परंतु तो सातत्याने 1976 पुर्वीच्या 3 लाख जमाती करता काम करतो. त्यामुळे त्याना 1976 प्रमाणपत्र मिळु शकत नाही. आदिवासी विभाग पुर्वी प्रमाणे समाज कल्याण विभागाल विलीन करावा. किंवा 1कोटी आदिवासी लोकांचा अ गट आणि 30 लोकांचा ब गट स्थापन करून वेगळे TRTI /वेगळे TAC वेगळे मंत्रालय व वेगवेळ्या समिती स्थापन कराव्या.
सर्वच्च न्यायालयाने 6 जुलै 1917 रोजी बहिरा केस संदर्भात दिलेला निर्णयाचा चुकीचा अर्थ काढुन आदिवासी विभाग व सामान्य प्रशास विभागाने षडयंत्र करून हा पुर्वलक्षी प्रभावाने लागु करून दि. 21|12|2021 रोजी काढलेला अधिसंख्य पदाचा शासन निर्णय रद्द करून कर्मचाऱ्यांना पूर्ववत करण्यात यावे.
उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी 7|12|2021 अधिसंख्य सेवानिवृत्ती कर्मचारी यांना न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून त्यांना ग्रज्युईटी व पेन्शन व इतर लाभ देण्याची कारवाई करावी. दिनांक 7जुनं 2021 च्या आदिवासी विभागाचा राज्यातील 1कोटी 30 लाख आदिवासीना नामशेष करणारा शासकीय आदेश तात्काळ रद्द करावा.
दि.12 ऑगस्ट 2021 मे. मुंबई उच्च न्यायालयचे न्या. गंगापुरवाला न्या. आर. एन. लढढा यांनी रिट रिपीटेशन नं. 8829/2021 नुसार टोकरे कोळी जमात प्रमाणपत्र सुनील कडू कोळी व धनश्री रवींद्र कोळी बामणोद ता. यावल जि.जळगांव यांना फैजपूर प्रांताधिकारी यांना टोकरे कोळी जमात प्रणाम पत्र मिळावे असे आदेश दिले आहे. तरी मा. मे. मुबंई उच्य न्यायालयाच्या आदेशानुसार संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील कोळी समाजाला टोकरे कोळी जातप्रमाण पत्र मिळावे अशी मागणी प्रा. संजय मोरे यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. केतकी पाटील, डॉ. संदिप गाढे, मंगला सोनवणे, शोभा कोळी, मयुर कोळी, चंद्रशेखर पाटील, आत्माराम म्हाळके, नरेंद्र पाटील, प्रा. मगन बाविस्कर ,प्रदीप पाटील, पिंटू पावरा, भूषण भिल, विजय बाविस्कर, गजानन कोळी, धनराज कोळी, गजानन काडेले, दिपक बाविस्कर, विकी गुजर, भुषण पाटील, कार्यकर्ते उपस्थित होते.