चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे येथे ३५ वर्षीय महिलेचा अनैतिक संबंधातील वादातून खून झाल्याची घटना बुधवार, ३ रोजी सकाळी उघडकीस आली. मेहुणबारे पोलिसांनी अवघ्या काही तासात खुनाची उकल केली असून आरोपी संतोष धोंडू भिल्ल (पिंपळवाड म्हाळसा, ता. चाळीसगाव) यास अटक केली आहे.
अनैतिक संबंधात वाद :अत्याचारानंतर केला खून
चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे येथील ३५ वर्षीय महिलेशी आरोपी संतोष धोंडू भिल्लचे संबंध होते. मात्र संबंधात वाद निर्माण झाल्यानंतर आरोपीने महिलेसोबत अतिप्रसंग करीत तिचा खून केला. कानाजवळ,डोळ्याजवळ व मांडीवर चाकूचे वार करीत मृतदेह गिरणा नदीपात्रातील वाळूच्या ढिगाऱ्यात पुरून दिला. बुधवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मेहुणबारे पोलिसांनी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने महिलेची फिरवण्यात आली. आरोपीने वरखेडे शिवारातील ज्ञानेश्वर निरमली यांच्या शेतात महिलेवर अत्याचार केला मात्र त्यानंतर वाद निर्माण झाल्याने तिचा खून करण्यात आल्याची बाब पोलीस तपासात समोर आली. मयत महिलेच्या जेठ यांनी या प्रकरणात फिर्याद दिल्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी उघडकीस आणला गुन्हा
मेहुणबारे सहा. निरीक्षक संदीप परदेशी, उपनिरीक्षक विकास शिरोळे, उपनिरीक्षक रमेश घडवजे, उपनिरीक्षक गोपाल पाटील, एएसआय मिलिंद शिंदे, हवालदार नितीन सोनवणे, दीपक नरवाडे, प्रकाश कोळी, गोरख चकोर, भूषण पाटील, सुदर्शन घुले, हनुमंत वाघेरे, जितूसिंग परदेशी, निलेश लोहार आदीनी हा गुन्हा उघडकीस आणला.