..अन् अचानक खा.सुप्रिया सुळे यांचा साडीचा पदर पेटला!

पुणे : राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खा. सुप्रिया सुळे यांच्या साडीला पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान अचानक आग लागली. सुप्रिया सुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत असताना त्यांची साडी दिव्याच्या ज्योतीत अडकली. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

बारामती लोकसभा मतदारसंघातील हिंजवडीत कराटे वर्गाचे प्रशिक्षण केंद्र आहे. त्या वर्गाचे आज रविवारी उद्घाटन झाले. यात खा. सुप्रिया सुळे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी दिवा लावत असताना त्यांच्या साडीला आग लागली.

..अन् आवाहन केले
यानंतर साडीला लागलेली आग तातडीने विझवण्यात आली. अशा परिस्थितीत मोठी दुर्घटना टळली. तसेच सुप्रिया सुळे यांना कोणतीच इजा झाली नाही. या कार्यक्रमानंतर त्या पुढील कार्यक्रमासाठी गेल्या. यावेळी त्यांनी इतरांना ही काळजी घेण्याचे आवाहन केले.