…..अन् आज महापालिकेच्या आयुक्त आल्यात सायकलीने

जळगाव :  नेहमी लक्झरीयस कारने येणाऱ्या महापालिकेच्या आयुक्ता डॉ. विद्या गायकवाड या आज बुधवार, ६ रोजी निवासस्थानापासून चक्क सायकलने आल्यात व सायकलनेच घरी गेल्यात. निमित्त होते नो व्हेईकल डेचे. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दोन महिन्यापासून महापालिकेतील अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांना महिन्याच्या पहिल्या बुधवारी नो व्हेईकल डे पाळण्याचे ठरविले आहे. शहरात वाढते प्रदूषण पाहता आयुक्तांनी हा निर्णय घेतला. त्यानुसार त्या स्वतः व अधिकाऱ्यांना महिन्याच्या पहिल्या बुधवारी सायकल, ई वाहन किंवा सार्वजनिक वाहनाने येण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार आयुक्तांनी पहिल्या महिन्यात रिक्षाने, दुसऱ्या महिन्यात ई बाईकने तर आता चक्क सायकलीने आल्यात.

अधिकान्यांनी गिरवला कित्ता
आयुक्तांच्या मुख्यलेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे उपायुक्त अविनाश गांगोडे, अभिजीत बाविस्कर हे आज चक्क कार्यालयात आले, तर अतिरिक्त पल्लवी भागवत, उपायुक्त निर्मला हे ई व्हेईकलने आलेत. तर सह अश्विनी गायकवाड, शहर चंद्रकांत सोनगीरे, मुख्यलेखा मारोती मुळे हे सार्वजनिक वाहनाने आले.
अन् आयुक्तांनी रद्द केल्या आजच्या सर्व मिटींगा

नो व्हेईकल डे असल्याने आयुक्तांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विंनती करून महिन्याच्या पहिल्या बुधवारी मिटींग न ठेवण्याची विनंती केली. यासोबतच आज दिवसभर कार्यालयात कृतीनुसार बसून कार्यालयीन कामकाजाचा निपटारा , केला. जिल्हाधिकारी यांनीही हा सहआयुक्त उपक्रम राबविण्याबाबतची विनंती केली. पायी याप्रमाणे सर्वच शासकीय कार्यालयांनी आयुक्त ठरविले तर नक्कीच शहराच्या प्रदुषणाची गायकवाड पातळी कमी होण्यास मदत होणार आयुक्त आहे. या उपक्रमाचा अवलंब इतर अभियंता विविध कार्यालये व कंपन्यांनी करण्याचे परिक्षक आवाहनही आयुक्तांनी केले आहे.

इतर शासकीय कार्यालयांनीही अनुकरण करावे शहरातील प्रदुषणाची पातळी कमी करण्यासाठी महिन्यातून एकदा सर्व शासकीय अधिकारी, कार्यालय प्रमुख, कर्मचाऱ्यांनी वाहनाने न येता पायी, सायकल, ई व्हेईकल ने यावे. आपणच आपल्या शहरातील प्रदुषणाची पातळी एवढ्याच्या छोट्या कृतीतन कमी ठेवू शकतो. त्यामुळे पुढील पिढीला त्याचा व पर्यावरणाला फायदा होईल.

– डॉ. विद्या गायकवाड, आयुक्त, जळगाव शहर महापालिका