लखनौ: ‘मानला तर देव, नाहीतर दगड असे म्हणतात; पण मध्यप्रदेशातील धारमध्ये लोक ज्या दगडाला कुलदेवता म्हणून पूजत होते, ते डायनासोरचे अंडे निघाले. शास्त्रज्ञांनी अभ्यास केल्यानंतर हे सत्य बाहेर आले असून, यामुळे तेथील लोकांना धक्का बसला आहे. पंडालय गावातील वेस्ता मांडलोई कुटुंब हे या गोलाकार दगडाची ‘काकर भैरव’ म्हणून पूजा करीत होते. ही परंपरा त्यांच्या पूर्वजांपासून सुरू होती. ही कुलदेवता शेती आणि गुरेढोरे यांचे रक्षण करते आणि त्यांच्या कुटुंबाला संकटांपासून वाचवते, अशी त्यांची श्रद्धा आहे. ‘काकर’ म्हणजे शेती आणि ‘भैरव’ म्हणजे देवता. मांडलोई यांच्याप्रमाणेच त्यांच्या गावातील अनेक लोक अशा दगडाच्या मूर्तीची
यापूर्वीही सापडली आहेत अंडी
एकेकाळी मध्यप्रदेशातील नर्मदा खोऱ्यात पृथ्वीवरून नामशेष झालेल्या डायनासोरची संख्या अधिक होती. या वर्षी जानेवारी महिन्यात धारमध्ये २५६ अंडी सापडली होती. त्यांचा आकार १५ ते १७ सेमी इतका होता. असे मानले जाते की, डायनासोर ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर राहत होते. तेव्हा मानवाची उत्पत्ती झाली नव्हती.
पूजा करतात, जे त्यांना धार आणि आसपासच्या परिसरात शेती करताना सापडले आहेत. आता नवीन तथ्ये समोर आल्यानंतर लोकांना धक्का बसला आहे. काही लोक मात्र या वस्तू आजपर्यंत देवता म्हणून पूजत होतो आणि यापुढेही पूजा करणार असल्याचे सांगतात. लखनौ येथील बिरबल साहनी पुरातत्त्व संस्थेचे शास्त्रज्ञ डायनासोरचे अवशेष शोधण्यासाठी मध्यप्रदेशातील धार येथे गेले होते. या परिसरात गेलेल्या त्यांच्या पथकाला एका शेतकऱ्याला त्याच्या शेतात गोलाकार वस्तू सापडल्या होत्या, ज्याची अनेक वर्षे पूजा केली जात असल्याचे समजले. त्यानंतर शास्त्रज्ञांनी त्याची तपासणी केली असता, ती डायनासोरची अंडी असल्याचे समजले.