Crime News: शाळेला विद्येचं मंदीर मानले जाते. शिक्षक हे आपले गुरु असतात आणि प्रत्येक गुरु पौर्णिमेला त्याची पूजा केली जाते.पण काही जण आपल्या कृत्याने या शिक्षकी पेशाला काळिमाच फासतात.अश्यातच एक घटना समोर आली आहे.शिक्षकाने एका विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे.पीडित विद्यार्थिनीने शाळेत जाणे बंद केले होते तिला कारण विचारले तिने जे कारण सांगितलं, ते ऐकून त्यांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला.
विद्यार्थिनीने सांगितलं खरं कारण
या शाळेत 9व्या इयत्तेत शिकणारी ही विद्यार्थिनी दोन दिवसांपासून शाळेत जात नव्हती. तिच्या घरच्यांनी तिला शाळेत जाण्यास सांगितले तेव्हा ती घाबरली आणि तिने जाण्यास नकार दिला. तुला शाळेता का जायचं नाहीये, काय कारण आहे, असं घरच्यांनी तिला विचारलं आणि तिचा बांधच फुटला. तिने घरच्यांसमोर सगळा प्रकार कथ केला. गोविंद नावाच्या शिक्षकाने शाळेत माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असे विद्यार्थिनीने सांगितले. 6 नोव्हेंबरला मी शाळेत गेली असताना आमचे शिक्षक, गोविंद सर यांनी कपडे काढले आणि ते माझ्यासमोर आले. त्यांनी मला जवळ ओढलं आणि अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. तिच हे बोलणं ऐकून घरचे हादरलेच. त्यांच्या प्रथम तिच्यावर विश्वासच बसेना. त्यांनी तातडीने शआळा गाठली आणि मुख्याध्यापकांना भेटून त्यांच्या मुलीसोबत घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्याध्यापकांनी त्या वर्गात लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले.
शिक्षकाने केला अत्याचाराचा प्रयत्न
मात्र ते फुटेज पाहून सगळेच हादरले. आरोपी शिक्षक गोविंद कपडे काढून वर्गात उपस्थित होता तर पीडित विद्यार्थिनी त्याच्यासमोरच काही अंतरावर उभी होती. त्या शिक्षकाने विद्यार्थिनीला जवळ खेचले आणि तिच्यावर जबरदस्ती करू लागला. भेदरलेल्या, घाबरलेल्या विद्यार्थिनीने स्वत:ला सोडवण्याचा, संरक्षण करण्याचा खूप प्रयत्न केला. मला सोडून द्या असे सांगत ती शिक्षकाकडे विनंतीही करत होती. हे सर्व दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले.
ॲसिड फेकण्याची दिली धमकी
मात्र त्या शिक्षकाने तिचे काहीच ऐकले नाही. एवढेच नव्हे तर त्याने तिच्या शरीरावर ॲसिड टाकण्याचीही धमकी दिली. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यावर पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी कोसीकलन पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. आरोपी शिक्षक सध्या फरार असून पोलिसांचे पथक त्याचा कसून शोध घेत आहे.