अपघात! समृद्धी महामार्गावर अपघातात ट्रक जळून खाक, दोन जण जखमी

by team

---Advertisement---

 

Samriddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. एका भरधाव ट्रकने रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने ट्रकमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. वाशिमच्या कारंजा जवळ हा अपघात झाला आहे.

समृद्धी महामार्गावर आज 11 मार्चच्या सकाळी 5:30 वाजताच्या सुमारास एक ट्रक (ट्रक क्रमांक PB 46W1738) हा नागपूरच्या दिशेन जात होता. दरम्यान, या महामार्गावर काही कारणास्थाव हा ट्रक रस्त्यालगत उभा असताना, मागून आलेल्या एका भरधाव ट्रकने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यानंतर या ट्रकने अचानक पेट घेतला. ट्रकला आग लागताच त्यातील चालक आणि इतरांनी ट्रकमधून पळ काढला. त्यामुळे या अपघात कुठलीही जीवितहानी झाली नाही. अल्पावधीतच आगीने दोन्ही ट्रकवर ताबा मिळवला. यात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून धडक लागल्याने ट्रक मध्ये अचानक शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---