अभिनेता गोविंदा अहुजा याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.यानंतर गोविंदा यांना उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गोविंदा यांचा शिवसेनेत प्रवेश पार पडला.गोविंदा यांच्या शिवसेना प्रवेशामागं लोकसभेची गणितं असल्याची चर्चा सुरु आहे. उत्तर पश्चिम मुंबईतून गोविंदाला लोकसभेची उमेदवारी मिळू शकते.
बुधवारी रात्री अभिनेता गोविंदानं माजी आमदार आणि शिंदे कृष्णा हेगडे यांची भेट घेतली होती. गोविंदा शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. गोविंदाला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असल्याची कृष्णा हेगडे यांनी सांगितलं होतं.
यापूर्वी गोविंदा २००४ ते २००९ या काळात काँग्रेसमधून खासदार बनले होते. त्यांनी भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांना पराभूत केलं होतं. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडली. पण आता पुन्हा वीस वर्षानंतर गोविंदाची राजकारणाची दुसरी टर्म सुरु झाली आहे.