तरुण भारत लाईव्ह । १३ जानेवारी २०२२ । मराठी चित्रपटसृष्टी आणि हिंदी टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता सुनील होळकर याचे आज (शुक्रवारी) निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
सुनिल लिव्हर सोरायसिस या दुर्धर आजाराने ते त्रस्त होते. अनेक उपचार करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. हा आजार असा आहे ज्यामध्ये कधीही शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काल पर्यंत ते ठीक होते, आज अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी एक मूल असा परिवार आहे.