अभिनेते सतीश जोशी यांचे निधन

मुंबई:  अभिनेते सतीश जोशी यांचे निधन झाले आहे.  रंगोत्सवाच्या रंगमंचावरच  सतीश  जोशी यांनी शेवटचा श्वास घेतला. यासंदर्भात त्यांचे मित्र अभिनेते राजेश देशपांडे यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन हे वृत्त दिले आहे.

सतीश जोशी यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. या पोस्टमध्ये राजेश देशपांडे यांनी लिहिलं आहे की, ‘आमचे ज्येष्ठ मित्र अभिनेते सतीश जोशी यांचे आज रंगोत्सवात स्टेजवरच दुःखद निधन झाले.  जाण्यापूर्वी त्यांनी अभिनय पण केला होता…. ओम शांती ओम’, असं देशपांडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. राजेश देशपांडे यांच्या  पोस्टला कमेंट करुन अनेकांनी सतीश जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सतीश जोशी यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांना धक्का बसला आहे